पत्नीच्या अनैतिक संबंधांना वैतागुन पतीनेच दिली खुनाची सुपारी; महिला म्हसरूळची !

राहुड घाटातील अज्ञात महिलेच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा !

नाशिक (विशेष प्रतिनिधी): पत्नीच्या अनैतिक संबंधाना वैतागून पतीनेच तिच्या खुनाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने याखुनाचा कौशल्याने तपास करून पतीसह इतर आरोपींना अटक केली आहे.

दिनांक १६/०६/२०२० रोजी चांदवड पोलीस ठाणे हद्दीतील राहुड घाट परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर रोडवे लगत नाल्यात एक अनोळखी महिलेचे प्रेत बेवारस स्थितीत मिळून आले होते. मयत महिलेस कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी अज्ञात कारणावरून जीवे ठार मारून मृतदेह रस्त्याच्या खाली फेकुन दिल्याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. १०६/२०२० भादंवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, संदीप घुगे (अपर पोलीस अधीक्षक मालेगाव), समीर साळवे (उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग) यांनी सदर घटनेची सविस्तर माहिती घेवुन अज्ञात मारेक-यांचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी तात्काळ त्यांच्या पथकासह घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची तसेच मयत महिलेच्या प्रेताची बारकाईने पाहणी करून खुनाच्या गुन्हयाचा कसोशिने तपास सुरू केला. मयत महिलेच्या वर्णनावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने नाशिक शहर व नजीकच्या जिल्हयांतील बेपत्ता महिलांचा शोध सुरू केला. तिने अंगावरील कपडे, मिळुन आलेल्या चिजवस्तु व शरिरयष्टीशी मिळते जुळते वर्णनाप्रमाणे अंबड पो.स्टे नाशिक शहर येथे मयत महिलेशी साम्य असलेली महिलेची मिसिंग दाखल असल्याची माहिती मिळुन आली. चांदवड पो.स्टे. हद्दीत मिळुन आलेल्या मयत महिलेचे प्रेत हे अंबड पो.स्टे, नाशिक शहर येथील दाखल मिसिंग महिला नामे निता नारायण चित्ते, वय ३९, रा. म्हसरूळ, नाशिक हिचेच असल्याचे निश्चित झाले.

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार

त्यानुसार सदर खुनाच्या गुन्हयाचा समांतर तपासात मयत नीता चित्ते ही दिनांक १४ जून रोजी सकाळी तिच्या माहेरी उत्तमनगर, सिडको येथे गेली असल्याचे समजले, त्यादिवशी ती शेवटी कोणाला भेटली याबाबत गोपनीय माहिती घेतली असता, ती १४ जुनला के के वाघ कॉलेजपासुन एका लाल रंगाच्या स्विफ्ट कार मध्ये बसुन गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयत महिलेचा पती नारायण शामभाउ चित्ते, वय ४९, रा. वित्ते प्लाझा, गजपंथ, म्हसरूळ यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली.

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार

त्याची पत्नी नीता चित्ते ही इतर पुरुषांशी वारंवार अनैतिक संबंध ठेवते, तिच्या अशा वागण्याने नारायण गित्ते हा त्रासून गेला होता. तिला त्याने वेळोवेळी समजावुन सांगुनही तिच्या वर्तनात फरक पडत नव्हता. याचा राग मनात धरून निताचा पती नारायण चित्ते याने त्याचा म्हसरूळ येथील जवळवा मित्र विनय निंबाजी वाघ, वय ५२, रा. गुलमोहर नगर, म्हसरूळ, नाशिक याच्या मार्फत उल्हासनगर येथील भरत देववंद मोची उर्फ मोरे वय-२८ रा. भिमनगर उल्हासनगर १, जिल्हा ठाणे यास नीता हिला जिवेठार मारण्यासाठी १० लाख रूपयाची सुपारी दिल्याचे कबुल केले आहे. विनय वाघ यास म्हसरूळ गजपंथ परिसरातुन अटक करण्यात आली असुन त्याने दिलेल्या माहिती वरून उल्हासनगर येथून आरोपी भरत देवचंद मोरे यास अटक केली आहे.

यातील आरोपी भरत देवचंद मोरे याने दिनांक १४/०६/२०२० रोजी रात्रीचे सुमारास त्याचा साथीदार नामे वाहिद अली शराफत अली स. पंचशिल नगर उल्हासनगर याचेसह मयत महिला निता हिस नाशिक येथुन के.के.वाघ कॉलेज समोरुन लाल रंगाचे स्विफ्ट कारमध्ये घेवुन जावुन राहूड घाट परिसरात तिचा साडीने गळा आवळून जीवे ठार मारले व तिचा मृतदेह रोडच्या वाटेला फेकून दिले असल्याचे काबुल केले आहे. त्यानंतर आरोपी भरत मोरे याने मयत नीताच्या पतीचा मित्र विनय वाघ याच्याकडुन दुस-या दिवशी सकाळी दि. १५/०६/२०२० रोजी विल्होळी येथे ०५ लाख रुपये घेतले व उर्वरित रक्कम नंतर आणुन दे असे सांगुन ते उल्हासनगर येथे निघुन गेले असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार

ताब्यात घेतलेले आरोपी नारायण शामभाउ चित्ते (मयताचा पती), विनय निंबाजी वाघ, भरत देवचंद मोरे यांना गुन्हयाचे पुढील तपासकामी चांदवड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग, समीर साळवे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सहा.पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मुकेश गुजर, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिलावट, पोलीस हवालदार संजय गोसावी, पोलीस नाईक हेमंत गिलबिले, पोलीस कॉनस्टेबल सुशांत मरकड, पोलीस कॉनस्टेबल मंगेश गोसावी, पोलीस कॉनस्टेबल प्रदिप बहिरम यांच्या पथकाने कौशल्यपुर्ण तपास करून सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790