नाशिक शहरात सोमवारी (दि. २९ जून) 123 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 5 जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. २९ जून) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने १२३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र- २०९ एकूण कोरोना रुग्ण:-२०४० एकूण मृत्यू:-१०४, घरी सोडलेले रुग्ण :- ८५२ उपचार घेत असलेले रुग्ण:- १०८४ अशी संख्या झाली आहे.

नाशिक शहरात सोमवारी सायंकाळी आढळून आलेल्या काही रुग्णांमध्ये: पिंजरघाट-२, पंचवटी-३, हिरावाडी-७, सातपूर-१, लेखा नगर-३, दिंडोरी रोड-१, मखमलाबाद-१, गंजमाळ-५, अंबड लिंक रोड-१, बागवानपुरा-१, वैदुवाडी (म्हसरूळ)-१, वडाळा गाव-१, गजानन चौक-२, नानावली-१, महालक्ष्मी चौक-१, राणा प्रताप चौक (सिडको)-१, गोसावी वाडी (नाशिकरोड)-१, उत्तम नगर (सिडको)-१, चेहेडी-१, जुना कुंभार वाडा-१, मजूरवाडी-३, भीमवाडी-१, पंचवटी-१, महाराणा प्रताप चौक-२, राम नगर (शनी मंदिरामागे)-२, मायको हॉस्पिटल (त्रिमूर्ती जवळ)-१, वावरे लेन (शालीमार)-१, फुले नगर-२, काझी नगर (वडाळा)-१, ठाकरे रोड-१, जगताप मळा (नाशिकरोड)-१, पंचवटी कारंजा-१, द्वारका-१, भाभा नगर-१, नवनाथ नगर-१, पेठ रोड-१, माथाडी सदन-१, पेठ लिंक रोड-१, गणेश नगर (मुंबई आग्रा रोड)-३, दुध बाजार-१, इंदिरानगर-१, भोई गल्ली (सावरकर चौक)-१, कामठवाडे-१, एमएचबी कॉलनी-१, गोळे कॉलनी-१, शिखरे वाडी-१, माउली निवास-२, गंजमाळ-२, पाथर्डी-१, तारवाला नगर-१, मुंबई आग्रा रोड-१, गाडगे महाराज वसाहत-२, भारत नगर-१, पौर्णिमा स्टॉप-१, नानावली दर्गा-१, मायको हॉस्पिटल-१, खाद्काळी-१, रामवाडी-१, वडारवाडी-१, इनामदार वाडी (खडकाळी)-१, पंडित कॉलनी-१, सह्याद्री नगर (सिडको)-१, साई नगर (दिंडोरी रोड)-१, देवळाली गाव-३, सिन्नर फाटा-१, मॉडेल कॉलनी (जेलरोड)-२, नवनाथ नगर-३, इतर- १४ यांचा समावेश आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

मयत रुग्णांची माहिती-
१) पंचवटी येथील ४५ वर्षीय महिलेचे दिनांक २८ जून २०२० रोजी निधन झालेले आहे. २)हिरावाडी, नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे दिनांक २८ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.३)पिंजर घाट,नाशिक येथील ५७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे दिनांक २९ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.४) उपनगर,नाशिक येथील ५४ वर्षीय  वृद्ध पुरुष व्यक्तीचे दिनांक २९ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.५)पंचवटी, नाशिक येथील ५२ वर्षीय महिलेची दिनांक २८ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here