नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) तब्बल ५६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १३५७, एकूण कोरोना रुग्ण:-१८,५९०, एकूण मृत्यू:-४१९ (आजचे मृत्यू ०७), घरी सोडलेले रुग्ण :- १६,३५५, उपचार घेत असलेले रुग्ण:- १८१६ अशी संख्या झाली आहे
नाशिक शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा..
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) गंगापूर गाव, नाशिक येथील २४ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. २) अलखराम सो, काझी नगर, वडाळा रोड, नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) शिवाजी उद्यान जवळ, पुणा रोड ,नाशिकरोड येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ४) पाटील गल्ली घर नंबर ४/२० जुने नाशिक येथील ४४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) पखाल रोड, नाशिक येथील ८१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) सातपूर, नाशिक येथील ३२ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ७) सावता नगर, सिडको येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.