नाशिक शहरात रविवारी रात्री उशिरा (7 जून) अजून 49 पॉझिटिव्ह; दिवसभरात 61 पॉझिटिव्ह

नाशिक(प्रतिनिधी): शहरात रविवारी (दि. 7 जून)रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्याने 49 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याआधी सायंकाळी 12 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे दिवसभरात एकूण 61 कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. यात सहा महिन्याच्या चिमुकलीचाही समावेश आहे. नाशिक रस्त्यांवरची गर्दी आणि कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चिंतेची बाब आहे.

रविवारी रात्री उशिरा आढळून आलेल्या कोरोनाबाधीतांमध्ये: वडाळा रोड-१, नाईकवाडीपुरा-१७, मायको हॉस्पिटल (दिंडोरी रोड)-१, भगवती नगर (हिरावाडी)-२, भरडवाडी-२, राजरत्न नगर(सिडको)-२, स्नेह नगर (म्हसरूळ)- ३, पखालरोड-७, काठे गल्ली-२, सातपूर कॉलनी-५, शिवशक्ती चौक-१, जाधव संकुल (सातपूर)-१, बागवानपुरा-१, अशोका मार्ग-१, काझी चौक (नाईकवाडीपुरा)-२ आणि स्वस्तिक नगर (पखाल रोड) -१ यांचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

याआधी रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे:

फुले मार्केट कोकणीपूरा येथील २८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

त्रंबक दरवाजा,दूध बाजार, नाशिक येथील २७ वर्षीय युवती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

खतीब बंगलो दारुसलाम कॉलनी येथील २७ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याच कुटुंबातील २५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल आलेला आहे. हे जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

चक्रधर सोसायटी टाकळी रोड नाशिक येथील ३४ वर्षीय व्यक्ती, ८ वर्षीय मुलगी,५६ वर्षीय व २९ वर्षीय महिला हे सर्व एकाच कुटुंबातील असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. हे जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

७, उत्कर्ष कॉलनी भाभा नगर, मुंबई नाका येथील २२ वर्षीय हा युवक ३१ मे २०२० रोजी अमेरिकेहून आलेला होता त्यास एका हॉटेल मध्ये कोरनटाईन करणेत येऊन त्याचे स्वाब घेण्यात आले होते त्याचा अहवाल आज आला असून तो अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

जयश्री निवास, गोविंद नगर नाशिक येथील ३९वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

पंचकृष्णा बंगलो, काठे मळा,टाकळी रोड येथील ३० वर्षीय व्यक्ती कोरोना   बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती:

पाटील पार्क,अंबड लिंक रोड येथील ४९ वर्षीय व्यक्तीला सर्दी-पडशाचा त्रास होत असल्याने दिनांक २६ मे २०२० रोजी उपचारासाठी दाखल झाली होती त्याच्यावर उपचार सुरू असताना आज रविवार दि. ७ जून २०२० रोजी सकाळी ८ च्या सुमारास त्यांचे निधन झालेले आहे. हा रुग्ण प्रतिबंधित क्षेत्रातील  परिसरातील होता.

बालाजी सदन,नागचौक,पंचवटी येथील ८५ वर्षाची महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता त्या महिलेवर उपचार सुरू असताना आज  रविवार दि. ७ जून २०२० रोजी रात्री १२.३० च्या सुमारास निधन झालेले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790