नाशिक शहरात ८ तासांत ६० मिमी पावसाची नोंद; आजही ‘येलो अलर्ट’, आज दोन टप्प्यांत विसर्ग !

नाशिक। दि. २० जून २०२५: शहरात गुरुवारी (दि. १९) पहाटे तीन वाजेपासून पावसाने जोर पकडला. दुपारी अडीच वाजेपर्यतच ५७.२ मि.मि. पाऊस झाला होता. नंतर जोर ओसरला. सकाळी ८:३० ते सायंकाळी ६:३० या दहा तासांत शहरात ६०.४ मि.मि. पाऊसइतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहर जलमय झाले. शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण क्षेत्रात ६७ मि.मि. पाऊस दुपारी चार वाजेपर्यंत झाला होता. त्यामुळे धरणात ६२ टक्के पाणीसाठा झाला.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

आजही ‘येलो अलर्ट’:
हवामान विभागाने शुक्रवारसाठी देखील येलो अलर्ट जारी केला असून दुपारी दोननंतर पावसाचा जोर ओसरेल मात्र तो नंतर कमी अधिक प्रमाणात सुरू राहील. तर ढगाळ वातावरण कायम राहणार असून हवामान विभागान सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जुने नाशिक चव्हाटा येथे देवी मंदिरामागील घर पावसामुळे कोसळले. सय्यद यांचा वाडा घर नं. ३५१५ यातील काही भाग कोसळला. शेजारीच एका घराची भिंतही कोसळली. वरच्या मजल्यावर दोन लहान मुले होती. त्यांना परिसरातील तरूणांनी सुरक्षिरित्या हलविले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

शरणपूर रोड येथे मनपाच्या राजीव गांधी भवनसह मुंबई नाका, त्रिमूर्ती चौक, दूध बाजार, निमाणी बस स्थानक, गंगापूर रोड, चार्वाक चौक, साईनाथ सिग्नल आदी गर्दीच्या ठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली. त्यामुळे वाहन काढणे जिकिरीचे झाले. पाण्याचा निचरा भूमिगत गटारींमध्ये वेगाने होत नव्हता. यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद पडली होती.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

आज दोन टप्प्यांत विसर्ग:
गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असून, शुक्रवारी (दि. २०) सकाळी सहा वाजता गंगापूर धरणातून विसर्ग ५०० क्युसेकने सोडण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता विसर्ग एक हजार क्युसेक करण्यात येईल. पुढील कालावधीत धरणामधील आवक बघून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here