
नाशिक (प्रतिनिधी): अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या 35 व्या नाशिक परीक्षेतील पोलीस क्रीडा स्पर्धा 2024-2025 ही 05 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय नगर येथे संपन्न झाली.
या क्रीडा स्पर्धेमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील पुरुष व महिला खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक खेळामध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत नाशिक परिक्षेत्रातील जिल्हा जळगाव, धुळे ,नाशिक ग्रामीण, नंदुरबार, अहिल्या नगर अशा एकूण सहा घटकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत पुरुषांचे हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो-खो, जुडो, कुस्ती, बॉक्सिंग, स्विमिंग, वेटलिफ्टिंग, पावर लिफ्टिंग, अथलेटिक्स या खेळाचा समावेश होता तसेच महिलांमध्ये बास्केटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी खो-खो जुडो कुस्ती बॉक्सिंग वेटलिफ्टिंग पावर लिफ्टिंग, तायकांडो ,उसू असा खेळांचा समावेश होता.

या स्पर्धेत नाशिक पोलीस आयुक्तालयाने पुरुष सांघिक खेळात हॉकी प्रथम , बास्केटबॉल प्रथम, कबड्डी प्रथम हँडबॉल प्रथम, फुटबॉल द्वितीय व्हॉलीबॉल दुतीय, मिळवला तसेच वैयक्तिक खेळांमध्ये अथलेटिक्स चॅम्पियनशिप क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप, वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप , स्विमिंग चॅम्पियनशिप,नाशिक आयुक्तालयाने मिळवली असून वैयक्तिक खेळात जुदो द्वितीय, कुस्ती द्वितीय प्रमुख पटकावून स्पर्धेत एकतर्फे विजय मिळून नाशिक पोलीस आयुक्तालयने नाशिक परिक्षेत्राची सर्वसाधारण जनरल चॅम्पियनशिप जिंकून नाशिक पोलीस आयुक्तालयाचे नाव उज्वल केले आहे.
महिलांच्या व स्पर्धेत बास्केटबॉल प्रथम क्रमांक व्हॉलीबॉल प्रथम क्रमांक, कबड्डी द्वितीय क्रमांक तसेच वैयक्तिक खेळांमध्ये अथलेटिक्स मध्ये 8 सुवर्णपदक ,12 रोप्य पदक,7 कास्यपदक प्राप्त केले आहे. तसेच वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप, कुस्ती द्वितीय , ज्युडो द्वितीय, बॉक्सिंग द्वितीय, महिलांची सर्वसाधारण जनरल चॅम्पियनशिप मिळवून संपूर्ण स्पर्धेमध्ये एकतर्फी विजय मिळवून परिक्षेत्राच्या क्रीडा स्पर्धेत नाव उज्वल केले आहे.
![]()

