नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या चेकिंग पॉइंटवर दोन कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आल्याने दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उपायुक्त वडनेर दुमाला एसएसटी पॉइंट येथे भेट देत पॉइंटवरील कर्मचाऱ्याची तपासणी केली असता तेथे बंदोबस्तावर नेमणुकीस असलेले भद्रकाली पोलिस ठाण्याचे सागर पाटील, मुंबईनाका पोलिस ठाण्याचे फिरोज खान हे कर्तव्यावर गैरहजर आढळून आले.
निवडणूक बंदोबस्ताच्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत शासकीय सेवेतून त्यांना निलंबित केले. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली असून रविवारी रात्री शहरातील सर्व चेकिंग पॉइंटवर वाहनांची कसून तपासणी सुरू होती.