Breaking

नाशिक: ५२ मद्यपी चालकांवर थेट मोटार वाहन न्यायालयात खटले

नाशिक। दि. ३० डिसेंबर २०२५: शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने मद्यपी वाहनचालकांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेत अवघ्या दहा दिवसांत ५२ मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करत त्यांच्याविरुद्ध थेट मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रेल्वे स्थानकांची संयुक्त पाहणी

‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’मुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक शाखेला कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार १६ ते २८ डिसेंबर या कालावधीत शहरातील सर्व वाहतूक युनिट्सकडून व्यापक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’च्या सहाय्याने वाहनचालकांची चाचणी घेण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील रस्त्यांच्या कामांमुळे २५ सिटीलिंक बसफेऱ्यांच्या मार्गात बदल

दरम्यान, इंग्रजी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपात राबवली जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे यांनी दिली.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन:
नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी अथवा कायदा मोडणारी कोणतीही कृत्ये टाळावीत, असे आवाहन केले आहे. पुढील काळात मद्यपी वाहनचालकांची तपासणी, नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम अधिक वेगाने राबवली जाणार आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना आढळून आल्यास थेट न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असून, इतर वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर ई-चलानद्वारे कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790