✒️ नाशिक/ मंदार देशपांडे (नाशिक कॉलिंग)
एमडी ड्रग्ज (मॅफेड्रॉन) विक्री करणाऱ्या एका इसमासह तीन महिलांना नाशिक शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १० जानेवारी २०२५ रोजी रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अविनाश फुलपगारे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फतीने माहिती मिळाली की, सर्व संशयित गणेश कैलास गिते (वय: ४५ वर्षे, रा. मखमलाबाद ता.जि. नाशिक), स्विटी सचिन अहिरे (वय: २८ वर्षे, रा. फ्लॅट नं २२, प्रकाश कॉम्प्लेक्स श्रीधर कॉलनी मेहरधाम मंदिर पेठ रोड नाशिक), ऋतुजा भास्कर झिंगाडे (वय: २२ वर्षे, रा. रूम नं ६, शिवाजी पार्क, शिवाजी नगर, गाजरे हॉस्पीटल जवळ, नाशिक) आणि पल्लवी गणेश निकुंभ उर्फ सोनाली शिंदे (वय: ३६ वर्षे, रा. नोवा हॉस्पीटलच्या शेजारी, साईनगर, अमृतधाम पंचवटी नाशिक) हे एमडी हा अंमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री करत आहेत.
मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा नाशिक शहराचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुशीला कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी, अंमलदार यांनी कौशल्याचा वापर करून, शिताफीने नमुद तीन महिला आरोपी व एक पुरूष आरोपी यांना छापा टाकून पकडले.
अंमली पदार्थ शोधक श्वान मॅक्स याचे मदतीने त्यांच्या ताब्यातून अंदाजे ४,१५,५०० रुपये किंमतीचा ७८.५ ग्रॅम वजनाचा एम. डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ (ड्रग्ज) व इतर १,९७,८२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मुददेमाल जप्त करून, नमुद आरोपींविरूध्द बेकायदेशिररित्या अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगतांना मिळून आले म्हणून मुंबईनाका पोलीस ठाणे येथे ०८/२०२५ एन.डी.पी.एस. १९८५ चे कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयातील महिला संशयित आरोपी नामे पल्लवी गणेश निकुंभ उर्फ सोनाली शिंदे वय ३६ वर्षे, हिच्या विरूध्द यापुर्वी इंदिरानगर पोलीस ठाणे, गुन्हा रजि क १२/२०२४ एनडीपीएस कायदा कलम ८ (क),२२(क),२९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे अंमली पदार्थ शोधक श्वान मॅक्स याच्या मदतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक देवकिसन गायकर, बेंडाळे, संजय ताजणे, पोलीस हवालदार भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, पोलीस अंमलदार अनिरूध्द येवले, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भड तसेच खंडणी विरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भोई, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जगताप, पोलीस अंमलदार भरत राऊत, महिला पोलीस अंमलदार सविता कदम तसेच अंमली पदार्थ शोधक श्वान पथकाचे पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस नाईक ससाने यांनी बजावली आहे.