नाशिक: पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सराईत गुन्हेगारांची धरपकड व अवैध दारुसाठा जप्त

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ दोनमध्ये पुन्हा टवाळखोरांनी डोके वर काढल्याने, आगामी महत्त्वाच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

यादरम्यान पोलिस ठाणेनिहाय सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात येऊन १७२ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी यांनी अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दींमध्ये शुक्रवारी (ता. १९) मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

⚡ हे ही वाचा:  राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता; नाशिकला यलो अलर्ट

अचानक राबविण्यात आलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमुळे सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांचे धाबे दणाणले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलीसांनी रेकॉर्डवरील १२३ सराईत गुन्हेगारांची तपासणी करून कारवाई करण्यात आली.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

तर, १७२ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांच्या घरझडतीमध्ये धारदार हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत.

उपनगरला अवैध मद्यसाठा:

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना वैदूवाडीत देशी-विदेशी बनावट दारुची अवैधरित्या विक्री करताना शंकर गुरु लोंखडे (३७, रा. वैदूवाडी, समतानगर, आगार टाकळी) यास उपनगर पोलिसांनी अटक केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

त्याच्याकडून ६ हजार ३९० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांच्यासह पथकाने केली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here