गुंडा विरोधी पथकाची कारवाई !

नाशिक (प्रतिनिधी): चारचाकी वाहनातून गावठी कट्टा, कोयते आणि चॉपर घेऊन फिरणाऱ्यास नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. गुंडा विरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करुन त्यांचेवर वेळोवेळी कारवाई करीत आहे.
गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी यांना गुप्त माहिती मिळाली की, संशयित मिलींद भालेराव हा त्याच्या चारचाकी वाहनामध्ये हत्यार घेवुन फिरत असुन तो आज रात्री रेणुका सोसायटी, वडाळानाका, नाशिक येथे येणार आहे. त्यावरुन सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि /ज्ञानेश्वर मोहिते यांना देवुन त्यांच्या सुचनेप्रमाणे श्रेणीपोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, भुषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, सुनिता कवडे यांचे दोन पथक तयार करण्यात आले.
या पथकाने वडाळा नाका येथील रेणुका सोसायटी परिसरात सापळा रचला. रात्री ११ वाजेच्या दरम्यान संशयित दुल्ली उर्फ मिलींद मनोहर भालेराव (वय 37, राहणार नागसेन नगर, वडाळानाका, नाशिक) याला महिंद्रा कंपनीचे लोगान कार (क्र. एम.एच. 04 डी.आर. 0065) सह ताब्यात घेतले असता त्याच्या कारमध्ये 1 देशी बनावटीचा पिस्टल, 2जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता व एक चॉपर असे एकुण 2,43,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितांवर भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे तसेच विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलीस ठाणेचे ताब्यात देवुन गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, भुषण सोनवणे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, प्रविण चव्हाण, सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.
![]()


