नाशिक: शहरातील ‘या’ परिसरात आज (दि. १२) वाहतूक मार्गात बदल !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): श्रावण मासानिमित्त सोमवारी कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेत वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पंचवटीतील रामकुंड, कपालेश्वर मंदिर परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिगारेट देण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून

कपालेश्वर मंदिर, रामकुंड, गंगाघाट या परिसरात दर सोमवारी १२, १९ व २६ रोजी आणि दर शनिवारी १७, २४ या तारखांना सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत मालेगाव स्टॅण्डकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग, खांदवे सभागृहकडून कपालेश्वर मंदिर, सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिर, ढिकले वाचनालय ते कपालेश्वर मंदिर या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. वरील मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क; ‘जिल्हा चारा सुरक्षा आराखडा’ तयार करण्याचे निर्देश

श्रावण महिन्यातील सोमवारी तसेच शनिवारी भाविकांकडून दर्शनासाठी पंचवटीतील तसेच गोदा घाट परिसरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत असते. विशेषतः कपालेश्वर मंदिरात सोमवारी गर्दी होत असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790