नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा तपासला जात आहे. सध्या जिल्ह्याला वैद्यकीय कारणांसाठी १९२५ जम्बो सिलिंडरचा पुरवठा होत आहे. प्रत्यक्षात जिल्ह्याची निर्मिती क्षमता ही १४ हजार सिलिंडर असून, सध्या ११ हजार सिलिंडर उपलब्धही होत आहेत. त्यामुळे तूर्तास तरी जिल्ह्यास रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत आहे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी ही माहिती दिली.
व्हेंटिलेटरवरील रुग्णांचीही संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. पण तूर्तास गरजेपेक्षा दुपटी-तिपटीपेक्षा अधिक क्षमतेने ऑक्सिजनची निर्मिती जिल्ह्यातील विविध १६ पुरवठादारांकडून केली जात आहे. सध्या गरजेपेक्षा पाचपटीहून अधिक ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. त्यामुळे उर्वरित ऑक्सिजन हा वैद्यकीयव्यतिरिक्त इंडस्ट्री आणि इतर बाबींसाठीही पुरवला जात आहे..!