नाशिक शहरातील या १४ ठिकाणी रेमेडीसीव्हर मिळणार १२०० रुपयात !

कोरोनावर उपयुक्त ठरणारे ‘रेमेडीसीव्हर’ आता या १४ ठिकाणी १२०० रुपयात मिळणार आहे.

नाशिक (प्रतिनिधी): शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच त्यांना उपयुक्त ठरणाऱ्या ‘रेमेडीसीव्हर’ इंजेक्शनच्या किमती कमी करण्यासाठी एफडीएने घेतलेल्या पुढाकारात सुरूवातीला १५ मेडिकल स्टोअर्सने १२०० रुपयांत इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

त्यानंतर आता अजून १४ मेडिकलवर रेमेडीसीव्हर उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. अवघ्या आठवडाभरात सुमारे नऊ हजार रुग्णांना कमी किमतीत रेमेडीसीव्हर उपलब्ध झाल्याने या रुग्णांचा प्रत्येकी ४ हजार रुपयांचा फायदा झाला आहे.

या १४ हॉस्पिटलमध्ये मिळणार रेमेडीसीव्हर
सातपूरमधील सुशीला हॉस्पिटल (कार्बननाका), संकल्प हॉस्पिटल, डॉ. कराड हॉस्पिटल (अशोकनगर), मोतीवाला हॉस्पिटल, व्हीकेआरजी रेडियंट हॉस्पिटल (नाशिकरोड), पंचवटीतील निरामय, लोकमान्य, सुयोग व साईनाथ हॉस्पिटल, म्हसरुळ येथील न्यू परिक्षित, सिडकोतील ग्लोबल व त्रिमूर्ती हॉस्पिटल, गंगापूररोडवरील मेडिसीटी. अशोका मार्गवरील पायोनिअर अशा १४ हॉस्पिटलमधील मेडिकलमध्ये ‘रेमडीसीव्हर उपलब्ध होणार आहे.

यासह मालेगावमधील अशोक मेडिकल ( दीपक टॉकीज), सायली मेडिकल, सिद्धिविनायक मेडिकोज (सटाणा) यांचा समावेश आहे.

अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी कोरोनानाबाधित रुग्णांना दिलासा देण्यासाठी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना उपयुक्त ठरणाऱ्या ‘रेमेडीसीव्हर’ या इंजेक्शनची एमआरपी ५४०० रुपये असताना अव्वाच्या सव्वा दर आकारून रुग्णांचीहो होत असल्याचे प्रकार समोर येत होते. हेच इंजेक्शन १२०० रुपयांत मिळणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790