नाशिक: ‘सारथी’ संस्थेच्या १००० विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या 156 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या विभागीय कार्यालय, अभ्यासिका, 500 मुलांचे व 500 मुलींच्या वसतिगृह इमारतींचे तसेच 43 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या धनगर समाजातील 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थीनी साठी वसतिगृह व कार्यालय इमारत आणि 25 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या वनभवन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे व मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून भुमिपूजन झाले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

भुमिपूजन समारंभ कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार हेमंत गोडसे, सकल मराठा समाज व सकल धनगर समाजातील मान्यवर आदि उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक मनपाची मोठी कारवाई; नाशिकरोड, पंचवटी व सिडको परिसरातील ९५ ठिकाणी अतिक्रमण हटविले

यावेळी सकल मराठा समाज बांधव आणि सकल धनगर समाज बांधव यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार करण्यात आला. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केलेल्या विविध विकास कामांवर आधारीत विकास पर्व या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790