नाशिक। दि. २९ जून २०२५: बाबाज् थिएटर्सतर्फे दर महिन्याच्या १ तारखेला ज्येष्ठ नागरिक व सुजाण संगीत प्रेमींसाठी संगीत मैफल व कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येते. या वेळी मंगळवार दिनांक १ जुलै रोजी कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड येथे संध्याकाळी ६.१५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या मासिक उपक्रमाचे हे ५६ वे पुष्प गुंफले जाणार आहे. प्रशांत जुन्नरे यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात अनघा धोडपकर, रसिकसूर प्रस्तूत ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या कविता व सुमधुर गाण्यांचा आविष्कार मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध भिडे, सहगायक रत्नाकर नवघरे, स्वानंद पारखी हे अमोल पाळेकर यांच्या वाद्यवृंद संचालनातून सादर करणार आहेत.
कविता वाचन व निवेदन अनघा धोडपकर आणि डॉ. स्वप्नील तोरणे हे त्यांच्या खास शैलीतून सादर करतील. तसेच याच कार्यक्रमाच्या सुरवातीला नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिकच्या तीन मान्यवरांना ‘कृतज्ञता सन्मान पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते सुहास शुक्ल आणि कलादिग्दर्शक, मूर्तिकार, चित्रकार शाम लोंढे हे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
पुरस्कारार्थी: अतुल भालेराव (चित्रकार, कला शिक्षक), दिपा बक्षी ( सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना). आणि सौ. दुहिता आणि हर्षद गोळेसर ( सुप्रसिद्ध पार्श्व गायक/गायिका).
तरी या विनामूल्य कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन प्रशांत जुन्नरे, प्रीतम पावशे, कैलास पाटील, जे पी जाधव, शामराव केदार, डॉ. प्रीतीश कुलकर्णी, दिलीपसिंह पाटील, राजा पाटेकर, योगिता पाटील यांनी केले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790