नाशिक: आज पहिला श्रावणी सोमवार; श्री कपालेश्वर मंदिरात रात्री १२ पर्यंत दर्शन !

नाशिक। दि. २८ जुलै २०२५: श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने सोमवारी (दि. २८) कपालेश्वर, सोमेश्वर महादेव मंदिर भाविकांनी गजबजणार आहे. श्री कपालेश्वर मंदिरात देखील पहाटे ४ वाजेपासून रात्री १२ पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर व कपालेश्वरला दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी !

महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. कपालेश्वर मंदिरात भाविकांना सोमवार व शनिवारी रात्री १२ पर्यंत दर्शन करता येणार आहे. मंदिरांत फुलांची सजावट करण्यात आली असून, मंदिर परिसरात पहाटेपासून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. गंगापूर रोडवरील सोमेश्वर महादेव मंदिरात सकाळी ६ ते रात्री ९ यावेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. सकाळी ६ वाजता त्रिकाल आरती केली जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790