नाशिक: पोलिस चौकीपासून अवघ्या काही अंतरावरील एटीएम मशीन पळविले

नाशिक (प्रतिनिधी): एटीएममधून पैसे पळविण्याच्या घटना कायम घडतात. मात्र चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच पळवून नेल्याची घटना इंदिरानगर येथील विनयनगर परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे विनयनगर पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावरच हे एटीएम नुकतेच लावण्यात आले होते.

हे ही वाचा:  नाशिक: लग्नास नकार दिल्याने १७ वर्षीय युवतीची आत्महत्या; युवकावर गुन्हा दाखल

इंडिया बँकेचे हे एटीएम आहे. चोरट्यांनी त्यातील रक्कम चोरण्याचा प्रयत्न न करता थेट पूर्ण मशीनच काढून नेल्याने हा परिसरात चर्चेचा विषय ठरला. या एटीएममध्ये २६ हजार ५०० रुपये असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांनी दिली. मुंबई नाका पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी घटनास्थळी पाहणी करीत माहिती घेतली असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी डाटा ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790