नाशिक: मोहम्मद रफींच्या गीतांची आज रंगणार मैफल !

नाशिक (प्रतिनिधी): गौरी पटेल आणि सूर शारदा म्युझिकल फाउंडेशनतर्फे प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांच्या गाण्यांची ‘हे जगाचे रक्षक’ मैफल शुक्रवारी (दि. २७) आयोजित करण्यात आली आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या मैफलीत मुख्य गायक घनश्याम पटेल यांच्यासह संजय डेरे, मनोहर देवरे, अजय पाटील, अमित गुरव हे गायक रफींची गाजलेली गाणी सादर करतील. या मैफलीला रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'लोकल टू ग्लोबल'च्या माध्यमातून नाशिकला जागतिक निर्यात केंद्र बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790