🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिकरोड रेल्वे स्थानकास स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड रेल्वे स्थानकास स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव देण्यात यावे अशी मागणी विश्व हिंदू सेनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, “देशाला स्वातंत्र मिळवुन देण्यात स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचे खुप मोठे योगदान आहे. स्वातंत्रवीर सावरकरांना दोन वेळा आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आलेली होती.अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये किती कष्ट व यातना झाल्या हे संपुर्ण जगाला माहित आहे. स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्हयातील भगुर या गावात झाला. भगुर ते नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे अंतर हे अवघे ०९ किलोमीटर इतके आहे.नाशिकरोड रेल्वे स्थानकाला तितक्याच आदर्श व्यक्तिमत्वाच्या महापुरूषाचे नाव देणे गरजेचे आहे.नाशिकरोड रेल्वे स्थानकास स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव दिल्यास प्रवासी व स्थानकावर येणारी रेल्वे, मालवाहतुक कर्मचारी यांना या महापुरूषांच्या आदर्शाचा व स्वातंत्र लढ्याचे स्मरण होईल व येणा-या पिढीला प्रेरणा मिळेल.”

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 27 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

यावेळी नाशिक भाजप चिटणीस अँड महेंद्र शिंदे, दादा आरोटे, दत्ता पाटील ,सतीश घैसास ,ॲड विशाल जाधव,आनंद पाटील ,संदेश पाठक ,शिव कुमार पांडे ,निलेश ढाकणे,अर्जुन शिंदे ,प्रसाद धोपावकर ,विशाल साळवे,धीरज खोळंबे ,दत्ता ढोकळे,शैलेश सावजी,सिद्धू खोचे,बाळा खाटेकर,

प्रसाद वाघ आदी मान्यवर उपस्थित होते

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790