नाशिक (प्रतिनिधी): बुधवारी (दि.२६) महाशिवरात्रीनिमित्त कपालेश्वर महादेव मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्रीकपालेश्वर महादेव संस्थानतर्फे ५१ हजार १११ रुद्राक्ष तसेच २५ हजार राजगिरा लाडू व १२५ किलो साबुदाणा खिचडी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानाचे अध्यक्ष अॅड. अक्षय कलंत्री यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
महाशिवरात्रीनिमित्त कपालेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंदिरात फुलांची सजावट करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच मनपा आयुक्त मनीषा खत्री आदी मान्यवर उपस्थित राहतील. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे १५ मिनिटात दर्शन व्हावे यासाठी संपूर्ण मंदिर परिसरात बॅरिकेड्स लावून भाविकांना रांगेने सोडले जाणार आहे. महाशिवरात्रीला बुधवारी पहाटे ५ वाजता मंदिर उघडले जाईल. यंदा २४ तास मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्याचा संस्थानाने निर्णय घेतला.
रामकुंड येथे विधिवत पूजन:
भाविकांच्या सुरक्षेसाठी २४ तास सीसीटीव्ही कॅमेरे आहे. मुख्य उत्सवाच्या दिवशी दुपारी चार वाजता पारंपरिक मार्गाने श्रीकपालेश्वर महादेवाची पालखी मिरवणूक काढण्यात येऊन रामकुंड येथे विधिवत पूजन केले जाईल.
![]()


