
नाशिक (प्रतिनिधी): कर्मयोगीनगर येथील जलकुंभालगतच्या भूखंडाची साफसफाई करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने महापालिका बांधकाम विभागाकडे केली आहे.
कर्मयोगीनगर येथील सर्व्हे नंबर ७७१ व ७७२ मध्ये महापालिकेचे लगतचे भूखंड आहेत. त्यातील काही भागात जलकुंभाचे काम करण्यात आले आहे, पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित भूखंडावर काटेरी झुडूपे मोठ्या प्रमाणात आहेत. बांधकाम साहित्य, माती आणि दगड-वीटांचे ढिग आहेत. हा भूखंड बारा मीटर रस्त्यालगत आहे. यामुळे रहदारीलाही अडचण येत आहे.
अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेळोवेळी येथून सर्पही रस्त्यावर आढळून येत आहेत. नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, जीविताला धोकाही निर्माण झाला आहे. महापालिकेने त्वरित हा भूखंड स्वच्छ करावा, अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, संदीप गहिवाड, शिवाजी मेणे, सचिन अमृतकर, पंकज सानप, अतुल पाखले, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, विनोद पोळ, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, आनंदा तिडके, संदीप कासार, पंढरीनाथ पाटील, सुनील सोनकांबळे, दिलीप रौंदळ, अशोक पाटील, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, सतीश मणिआर, सचिन राणे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींनी केली आहे. बांधकामचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790