नाशिक (प्रतिनिधी): शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागातर्फे गंगापूररोड येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात शारदीय ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ३ ते १६ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
उत्सवाची सुरुवात ३ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता महापूजेने होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता ध्वजपूजन होणार आहे. भाविकांनी शारदीय ब्रह्मोत्सवातील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790