नाशिक: बारावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; जुना गंगापूर नाक्यावरील घटना

नाशिक (प्रतिनिधी): जुना गंगापूर नाका परिसरात असलेल्या खासगी वसतीगृहात राहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्यांने राहत्या खोलीत गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सुमित अमृत पाटील (वय: १७, सध्या रा. ज्ञानदीप सोसायटी, जुना गंगापूर नाका. मूळ रा. नंदूरबार) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. सुमितचे वडील अमृत पाटील हे नंदूरबार येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून शहरातील एका खासगी क्लासेससाठी तो जुना गंगापूर नाका परिसरातील खासगी वसतिगृहात राहत होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बीएसएनएल केबल चोरी प्रकरणात मोठा पर्दाफाश; मुंबईतून २.८८ कोटींचा मुद्देमाल जप्त, ६ अटकेत

दररोज सकाळी त्याच्या रुममधील सहकार्यांसह सारे क्लासला जातात. मंगळवारी (ता. २२) सकाळी सुमित याने काही कारणास्तव क्लासला जाणे टाळले. त्यामुळे वस्तीगृहातील व रुममधील मित्र क्लासला गेले. क्लासवरून दुपारी बारा-साडेबाराच्या दरम्यान क्लासवरून मुले परत आली.

त्यांनी रुम उघडली असता, सुमीत याने गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी तत्काळ सरकारवाडा पोलिसांना माहिती देण्यात आली असता, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

तसेच पोलिसांनी नंदूरबार येथील त्याच्या पालकांना माहिती कळविली. सायंकाळी उशिरा पालक दाखल झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. आत्महत्त्येमागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, अभ्यासाच्या नैराश्यातून त्याने सदरचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790