नाशिक: मालट्रकने दिलेल्या धडकेत २१ वर्षीय दुचाकीस्वार ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पेठरोडवरील एस.टी.वर्कशॉप भागात भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत २१ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. विवेक लहानू पवार (रा.गोकुळ सोसा.गोरक्षनगर म्हसरूळ) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातात ट्रकचे चाक युवकाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक सोडून पसार झालेल्या अज्ञात चालकाविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अवैध सावकार वैभव देवरेच्या जाचाला कंटाळून शहरातील व्यावसायिकाची आत्महत्या...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक पवार सोमवारी (दि.१७) रात्री अकरा वाजेच्या सुमारास एमएच १५ बीसी ५१७२ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पेठरोडने तो राहू हॉटेलच्या दिशेने प्रवास करीत असतांना मेहरधाम परिसरातील एस.टी.वर्क शॉप समोर पाठीमागून भरधाव येणाऱ्या एचआर ७४ बी ३६२० या मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिली.

हे ही वाचा:  उत्तर महाराष्ट्रात २ दिवस मध्यम पावसाची शक्यता

या अपघातात दुचाकीस्वार विवेक पवार याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक आपले वाहन सोडून पसार झाला असून याप्रकरणी लहानू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १५८/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790