नाशिक: अवैध सावकारी प्रकरणी दोन सावकारांवर गुन्हा; घरझडतीमध्ये आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

नाशिक। दि. १९ जुलै २०२५: अवैध सावकारी करणाऱ्या दोन सावकारांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिबंधक सहकारी संस्था आणि पोलिसांच्या कारवाईत घरझडतीत कर्जदारांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

एम. डी. इतेशम (रा. वडाळारोड) आणि सनी जाधव (रा. धृवनगर) अशी संबंधित सावकारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती आणि उपनिबंधक कार्यालयाचे शैलेश पोतदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रार अर्जाची चौकशी केली. संशयित इतेशम व जाधव हे दोघे अवैध सावकारी करत असल्याचे तपासात आढळून आले. संशयितांच्या घरातून मालमत्तेसंबंधी कागदपत्र जप्त करण्यात आली. (गंगापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक: १७९/२०२५)

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here