🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागातर्फे आज, उद्या व्याख्यान

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागाकडून कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल येथे रविवारी (दि. १९) आणि सोमवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी इंद्रनील बंकापुरे ‘मंदिरांच्या देशा’ या विषयावर विचार मांडतील. या दृकश्राव्य कार्यक्रमात देशातील विविध प्रसिद्ध मंदिरांचे दर्शन होईल. कुर्तकोटी शंकराचार्य यांच्या १४५ व्या जयंती दिनानिमित्त सोमवारी संत सेवा संघाचे संजय गोडबोले यांचे ‘मानवी जीवनात सदगुरूंचे स्थान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 27 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790