
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील तपोवन येथे असलेल्या एका प्लायवूडच्या गोदामाला मध्यरात्री १२.१५ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे निश्चित कारण कळू शकले नव्हते. आगीचे स्वरूप मोठे असल्याने अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाले. आगीवर रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळविण्यात यश आले नव्हते. त्यासाठी जवान आटोक्याचे प्रयत्न करीत होते.
तपोवन परिसरातील ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये अचानकपणे मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास आगीचा भडका उडाला. घटनास्थळी अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी तातडीने दाखल झाले.
आगीचे वृत्त कळताच घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाकडून या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात होते. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.
(अधिक माहिती मिळताच बातमी याच ठिकाणी अपडेट करण्यात येईल.)
![]()


