नाशिक: पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक । दि. १८ जानेवारी २०२६: सातपूर येथील कामगारनगर परिसरातील गौरव सोसायटीत झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुशल जितेंद्र जैन (वय ६) असे मृत बालकाचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय, आदिती तटकरे यांची पोस्ट नेमकी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कुशल हा सोसायटीच्या आवारात इतर मुलांसोबत खेळत होता. खेळताना धावत असताना तो झाकण नसलेल्या भूमिगत पाण्याच्या टाकीत पडला. इतर मुलांनी आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

तत्काळ त्याला पाण्याबाहेर काढून खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एटीएममध्ये कार्डची अदलाबदल करून ४० हजारांची फसवणूक

या घटनेमुळे गौरव सोसायटीसह परिसरातील सोसायट्यांमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी भूमिगत पाण्याच्या टाक्यांवरील झाकणे नसणे किंवा खराब अवस्थेत असणे ही गंभीर बाब ठरत असल्याचे नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

उघड्या टाक्यांमुळे धोका वाढला:
सोसायटीतील पाणीपुरवठ्यासाठी उभारलेल्या भूमिगत टाकीवर झाकण नसल्याने ती धोकादायक स्थितीत असल्याचे घटनास्थळी पाहणीदरम्यान निदर्शनास आले. संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून आवश्यक सुरक्षाव्यवस्था न करण्यात आल्याकडे पोलिसांनी लक्ष वेधले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790