Breaking

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात उड्डाणपुलावर बसला भीषण आग…

नाशिक। दि. १७ डिसेंबर २०२५: नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील उड्डाण पुलावर आज एसटी महामंडळाच्या शहादा डेपोच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सदर बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती दुरुस्तीसाठी वर्कशॉपकडे नेत असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना अटक !

बसमध्ये बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना आधीच सुरक्षितरित्या खाली उतरविण्यात आले होते. त्यामुळे बसमध्ये कुणीही प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात आजपासून ‘महा-साधना सप्ताह’

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790