नाशिक (प्रतिनिधी): सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने ‘स्वर सावाना’ अंतर्गत शनिवारी (दि. १५) ‘राग रंग’ हा विविध रागांवर आधारित हिंदी-मराठी स्वररचनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यात शास्त्रीय गायक सूरज बारी, गायिका रसिका नातू व आरती पिंपळकर हे विविध रचना सादर करतील. वाद्यवृंद संयोजक – अमोल पाळेकर, निवेदन – ज्ञानेश वर्मा, प्रस्तुती – साद स्वरांची, साउंड सचिन तिडके यांची असणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मृदुला सुहास शुक्ल व सुहास गोपाळराव शुक्ल यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी कार्यक्रमाला सावाना सभासद आणि नाशिकच्या संगीत प्रेमी रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष वैद्य. विक्रांत जाधव, डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष अॅड. अभिजित बगदे, प्रमुख सचिव देवदत्त जोशी, सहा. सचिव जयेश बर्वे, अर्थसचिव गिरीश नातू, ग्रंथसचिव जयप्रकाश जातेगावकर, सांस्कृतिक सचिव संजय करंजकर, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, वस्तुसंग्रहालय सचिव सौ. प्रेरणा बेळे, धर्माजी बोडके, प्रा. सोमनाथ मुठाळ, मंगेश मालपाठक, सांस्कृतिक सहसचिव प्रशांत जुन्नरे, अॅड.भानुदास शौचे यांनी केले आहे.