नाशिक (प्रतिनिधी): परिमंडळ २ मधील नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, अंबड, इंदिरानगर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ८ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आली. उपायुक्त मोनिका राऊत यांच्या कार्यालयाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करत नागरिकांत दहशत निर्माण करणे आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयितांची यादी तयार करण्यात आली होती. यात तैयब बबलू पठाण (रा. वडाळा), शादाब जाकीर सय्यद (रा. देवळाली कॅम्प), रोहित प्रवीण पारखे (रा. मंगलमूर्तीनगर), सिद्धू ऊर्फ सिद्धार्थ किशोर परदेशी (रा. आनंदरोड, देवळाली कॅम्प), सनी ऊर्फ मॉन्टी रमेश दळवी (रा. कामटवाडे), मयूर नंदकिशोर सोनवणे (रा. राजरत्ननगर, सिडको), हर्षद ऊर्फ कच्छी नंदु त्रिभुवन (रा. नाशिकरोड), प्रवीण चिंतामण महाजन (रा. बोधलेनगर, पुणेरोड) असे तडीपार केलेल्या संशयितांची नावे आहेत.