नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर पोलीस स्टेशन कडील निकाली गुन्ह्यातील 23 व बेवारस स्थितीतील मिळून आलेल्या 8 मोटार सायकल वाहनांच्या मालकांना समजपत्र पाठविण्यात आले आहे. परंतु अद्यापही मालकी हक्काबाबत मालकांनी कोणतेही कागदपत्र सादर केलेली नाहीत. 7 दिवसांच्या आत मालकी हक्काबाबत पुरवा सादर करून इंदिरानगर पोलीस स्टेशन येथून वाहने घेवून जावीत, असे आवाहन इंदिरा नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
वाहनांचा तपशिल इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे उपलब्ध असून या वाहनांच्या मालकांनी कोणतीही कार्यवाही न केल्यास सदरच्या वाहनांची पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्या परवानगीने लिलावाद्वारे विल्हेवाट लावण्यात येईल व त्यानंतर काहीएक सबब इंदिरानगर पोलीसांकडे राहणार नाही, असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी कळविले आहे.