शिवसेना, ‘सत्कार्य’ फाउंडेशनची मागणी

नाशिक (प्रतिनिधी): कर्मयोगीनगरमधील रणभूमी ते भामरे मिसळ रस्त्याचे काम त्वरित सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका शहर अभियंता संजय अग्रवाल यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या प्रयत्नांनंतर या रस्त्यासाठी अर्थसंकल्पात सव्वा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. अडीच वर्षांच्या पाठपुराव्यानंतर १४ डिसेंबर २०२४ रोजी महापालिकेने या कामाची निविदा प्रसिद्ध केली. ९ जानेवारीपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत होती. दोन महिन्यांनंतरही निविदा उघडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. यामुळे काम सुरू होण्यास आणि ते पूर्ण होण्यास विलंब होणार आहे.
परिणामी, पावसाळ्यात काम पूर्ण न झाल्यास नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. बडदेनगर ते पाटीलनगर रस्त्याला जोडणारा हा रस्ता असल्याने गोविंदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. बांधकाम विभागाने प्रक्रिया पूर्ण करून काम त्वरित सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, विनोद पोळ, संदीप गहिवाड, शिवाजी मेणे, सचिन अमृतकर, पंकज सानप, अतुल पाखले, डॉ. शशीकांत मोरे, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, आनंदा तिडके, संदीप कासार, पंढरीनाथ पाटील, दिलीप रौंदळ, सतीश मणिआर, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मीना टकले, वंदना पाटील, दीपक दुट्टे, राहुल काळे, सचिन राणे, हरिष काळे, सुनील सोनकांबळे यांच्यासह रहिवाशांनी केली आहे.