
नाशिक (प्रतिनिधी): वर्ल्ड ओबेसिटी डे निमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नामांकित सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट डॉ. संदीप सबनीस (MS, DNB) यांनी यशस्वीरित्या ५० बॅरियाट्रिक सर्जरी पूर्ण केल्याची उल्लेखनीय कामगिरी साजरी करण्यात आली.
डॉ. संदीप सबनीस यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, “बॅरियाट्रिक सर्जरी ही केवळ वजन कमी करण्यासाठी नसून, ती मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, ऑर्थोपेडिक समस्या आणि इतर स्थूलत्व-संबंधित आजार नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. या शस्त्रक्रियेमुळे पचनक्रिया सुधारते, शारीरिक कार्यक्षमता वाढते आणि रुग्णांचे संपूर्ण आरोग्य सुधारते. त्यामुळे स्थूलत्वाशी संघर्ष करणाऱ्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया दीर्घकालीन आरोग्यासाठी वरदान ठरू शकते.”
डॉ. सबनीस मागील ३ वर्षांपासून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून, पोटविकार आणि पचनसंस्थेशी संबंधित शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा व्यापक अनुभव आहे. त्यांच्या कौशल्यपूर्ण उपचारांमुळे अनेक रुग्णांनी स्थूलत्वावर नियंत्रण मिळवून एक निरोगी जीवनशैली स्वीकारली आहे. या कार्यक्रमात त्यांच्या उपचाराने यशस्वी झालेले रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांनी आपल्या अनुभवांचे कथन करत, शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या आयुष्यात झालेले सकारात्मक बदल सांगितले आणि डॉ. सबनीस व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुशील पारख म्हणाले, “उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून अशोका मेडिकव्हर गेल्या ७ वर्षांपासून अत्याधुनिक वैद्यकीय सेवा प्रदान करत आहे. बॅरियाट्रिक सर्जरीसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडत आहेत. डॉ. संदीप सबनीस यांनी केलेल्या ५० बॅरियाट्रिक सर्जरी या उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवेतील एक महत्त्वाची उपलब्धी आहे.”
स्थूलत्व ही जागतिक स्तरावर गंभीर आरोग्य समस्या बनली आहे, आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल समाजामध्ये जनजागृती करून अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
या कार्यक्रमाला अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी आणि मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित रुग्ण, नातेवाईक आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानले व भविष्यातही अशाच प्रकारे आरोग्यसेवेत उच्च दर्जाचे योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
![]()


