नाशिक (प्रतिनिधी): तक्रादराला मारहाण करणारे अंमलदार योगेश ढमाले यांना पोलिस आयुक्तांनी निलंबित केले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार संतोष गंजी रा. सोलापूर यांची शालीमार येथून बॅग चोरी झाली होती. याची तक्रार देण्यास जंगी पोलिस ठाण्यात गेले होते.
ठाणे अंमलदार ढमाले यांनी तक्रारदाराला शालीमार येथे थांबा पोलिस येतील असे सांगीतले. दोन तासांनंतर जंगी पुन्हा पोलिस ठाण्यात ते आले असता जंगी ढमालेंना म्हणाले की, दोन तास उभे ठेवले, पोलिस आले नाही तुम्ही काय बॅग शोधणार असे बोलले. याचा राग आल्याने ढमाले यांनी जंगी यांच्या कानाखाली मारली. याबाबत गंजी यांनी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती ढमाले यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस आयुक्त संदीप आयुक्त यांनी ढमाले यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
![]()
