नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात मतदार यादी शुद्धीकरणासाठी आज (दि. ३१) विशेष मोहिम

नाशिक। दि. ३१ मार्च २०२६: 125 नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी 31 मार्च, 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत विशेष मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन 125 नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी शुभांगी भारदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘उल्लास नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात फ्लॅन्ट परीक्षेचे आज (दि. २९) आयोजन

मतदार यादीतील अस्पष्ट, आकारविरहित व मानवी नसलेल्या ( Blussed, Non Dimensional and Non-Human) छायाचित्रांची पडताळणी करून मतदाराचे स्पष्ट छायाचित्र प्राप्त करून अद्ययावत करण्यात येणार आहे. याशिवाय सन २००२ च्या मतदार यादीशी सन २०२४ च्या यादीचे मॅपिंग (जुळवणी) करून मतदार यादी अधिक अचूक करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी संबंधित मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकावर धारदार शस्त्राने हल्ला; तिघांविरोधात गुन्हा

मतदारांनी आपल्या नाव, पत्ता, वय, छायाचित्र किंवा मोबाईल क्रमांकात काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून घ्यावेत. तसेच दुबार नाव अथवा अन्य त्रुटी असल्यास त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यासाठी मतदार केंद्रीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

नागरिकांनी मतदान केंद्रावर येताना आपले मतदार ओळखपत्र (EPIC Card) सोबत आणावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती भारदे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790