नाशिक: अवैध मद्य विक्री प्रकरणी २० हून अधिक हॉटेल व्यावसायिकांना दंड

नाशिक। १३ ऑक्टोबर २०२५: मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेले हॉटेल, सोडा विक्री केंद्रांच्या गाड्यांवर मद्यपान होत असल्याच्या वाढत्या तक्रारी पाहता राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान २० हून अधिक हॉटेल व धाब्यांवर एकाचवेळी छापे टाकून कारवाई केली. हॉटेल व्यावसायिकांना नोटीस देऊन त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. कारवाईदरम्यान मद्यपान करताना आढळलेल्या अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ज्यांनी अनधिकृतपणे मद्यपानाची सोय उपलब्ध करून दिली त्या धाबे-मालकांविरोधातही कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790