महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 12 कागदपत्रे पुरावे अनुज्ञेय

नाशिक। दि. ९ जानेवारी २०२६: राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नाशिक महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त अन्य 12 पुरावे अनुज्ञेय असल्याचे नाशिक महानगरपालिका प्रभाग 8 ते 11 चे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

असे आहेत पुरावे:
1.भारताचा पासापोर्ट
2.आधार ओळखपत्र
3.वाहन चालविण्याचा परवाना
4.आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र.
5. राज्य शासनाचे फोटो ओळखपत्र
6.राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफीस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक
7.सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला.
8.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र (MNREGA) जॉब कार्ड
9.निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्ती यांची फोटो असलेली निवृती वेतन
विषयक कागदपत्रे उदा. पासबुक, प्रमाणपत्र इत्यादी
10.लोकसभा/ राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा/ विधानपरिषद/ सचिवालय यांनी आपल्या
सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
11.स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र
12.केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड. इत्यादी कागदपत्रे
पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  'एअर शो'ला जाण्याआधी ही बातमी नक्की वाचा… गंगापूररोडवरील वाहतूक मार्गात आज (दि.२३) बदल !

मतदान प्रक्रिया ही बहु सदस्य निवडणूक पद्धतीने होणार असल्याने प्रत्येक मतदाराला ४ मत देण्याचा अधिकार असणार आहे. प्रत्येक प्रभागात ४ जागा आहेत त्यांना जागा ‘अ’, जागा ‘ब’, जागा ‘क’ व जागा ‘ड’ याप्रमाणे नाव दिलेले आहे. या प्रत्येक जागेचे मतपत्रिकेला वेगवेगळा रंग दिलेला आहे. जागा ‘अ’ साठी पांढरा, जागा ‘ब’ साठी फिका गुलाबी, जागा ‘क’ साठी फिका पिवळा आणि जागा ‘ड’ मतपत्रिका फिका निळा रंगाची असणार आहे. मतदाराने मतदान केंद्रावर गेल्यांनतर या प्रत्येक जागेच्या एका उमेदवाराला एक याप्रमाणे चार मत नोंदविणे आवश्यक आहे, त्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

🔎 हे वाचलं का?:  सलग चार दिवस बँका बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्र व केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात मोबाईल फोन, कॉडलेस फोन, वायरलेस फोन वापरण्यास प्रतिबंध केलेला आहे. तसे आढळून आल्यास संबंधित मतदारावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यामुळे मतदाराने मतदानास येतांना मोबाईल आणू नये, असेही आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.मंगरूळे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790