नाशिक: 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई। दि. ९ जानेवारी २०२६: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790