
नाशिक। दि. १ डिसेंबर २०२५: गोविंदनगर येथील संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५२ हजार ५७५ रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला.
महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी मोठी अतिवृष्टी झाली, यात शेतकर्यांसह गोरगरीब नागरिकांचे मोठे नुकसान झाले. शेती खरडून गेली, वाहून गेली, घरांची पडझड झाली, संसार उद्ध्वस्त झाले. या अतिवृष्टीग्रस्तांना मदत व्हावी, या भावनेतून संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे व त्यांच्या सहकार्यांनी मदत जमा केली. सोमवारी, आज ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली, ५२ हजार ५७५ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला.
यावेळी विठ्ठलराव देवरे, राधाकृष्ण जाधव, प्रकाश नाईक, बापुराव पाटील, धरमचंद चौधरी, रमेश पाध्ये, कारभारी मोरे, नारायण कासार, प्रथमेश घाटकर, शेखर पुंड, दिलीप जगताप, सिताराम गुंजाळ, ज्ञानेश्वर चौधरी, शामराव पळशीकर, कृष्णाजी विसाळे, सुरेश शिरोरे, सुभाष चौहान, सूर्यकांत आहिरे, एन. डी. मोरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते, सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत घोंगे, शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक हजर होते.
![]()
