नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महावितरणच्या ३३ के व्ही पाथर्डी आणि भगुर या विद्युत वाहिनीजवळील झाडांच्या फांद्या काढण्याकरिता व ३३/११ केव्ही पाथर्डी उपकेंद्र देखभाल दुरुस्ती कामाकरीता तसेच १३२ केव्ही उपकेंद्रातील महापारेषणच्या नियोजित कामाकरिता खालील दिलेल्या भागात १८मे रोजी शनिवार, दुपारी १ ते संध्याकाळी ५ पर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे, ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन पाथर्डी शाखा कार्यालयाने केले आहे.
यामधे ११ केव्ही पाथर्डी वाहिनीवरील खालील रोहित्र आहेत:
पाथर्डी, एकता, अमित, वडनेर, रेडिसन (राहुल अँड प्रणव), राजीवनगर, नयनतारा, पार्कसाईड, इंदिरानगर, वासन नगर, यांचा समावेश आहे.
महावितरणच्या उपनगर कक्षाअंतर्गत असलेल्या इच्छामणी, समतानगर, गांधीनगर, डीजीपी नगर, एनएमसी वॉटर सप्लाय या ११केव्हीं विद्युत वाहिन्यांवरील वीज पुरवठा शनिवार १८ मे २०२४ रोजी दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेदरम्यान टप्याटप्याने बंद राहणार आहे. यादरम्यान सदर ११ केव्ही विद्युत वाहिनीला लागणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी तसेच विद्युत यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्तीसाठी परिसरातील विद्युत पुरवठा काही काळासाठी टप्याटप्याने बंद असणार आहे. तरी वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे.
सदर कामाकरिता दिलेल्या भागात व वेळेत विद्युत पुरवठा बंद राहील. मात्र वेळेत काम पूर्ण न झाल्यास वीजपुरवठा सुरू करण्यास काहीसा विलंब होऊ शकतो याची कृपया वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी व संयम राखून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.