नाशिक: शतपावली करणा-या ४० वर्षीय व्यक्तीचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शतपावली करणा-या ४० वर्षीय व्यक्तीचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात एअरफोर्स मार्गावर झाला होता. सदर व्यक्तीवर मिलीटरी रूग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये संततधार पाऊस, गंगापूर धरणातून ३,०९९ क्यूसेक विसर्ग

बाबू लाल भोई (रा.ईडीएएफ एअरफोर्स दे.कॅम्प) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भोई बुधवारी (दि.१५) रात्री मुलीसोबत शतपावलीसाठी घराबाहेर पडले असता हा अपघात झाला. एअरफोर्स रोडवर बापलेक शतपावली करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात दुचाकीने भोई यांना जोरदार धडक दिली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘अमृत’ मार्फत 'पराक्रम दिना' निमित्त १ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन

या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने पत्नी तुलसी भोई यांनी त्याना तातडीने मिलीटरी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचार सुरू असतांना मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. याबाबत लेफ्टनंट कर्नल डॉ. तिरूपम सुमन यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790