नाशिक: मेन रोडला दिवाळीच्या खरेदीसाठी जाणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे…

नाशिक (प्रतिनिधी): दिवाळी सणाची खरेदी सुरू झाली आहे. यामुळे शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार कारंजा, दहीपूल, शालिमार, रेडक्रॉस चौक आदी भागात नागरिकांची गर्दी उसळत आहे.

यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने सर्वप्रकारच्या वाहनांना शुक्रवारपासून म्हणजेच दि.२५ ऑक्टोबर २०२४ ते ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना वाहतूक विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शहरातील मध्यवर्ती बाजारपेठांच्या परिसरात ग्राहकांची विशेषतः महिलावर्गांची गर्दी होऊ लागली आहे. खरेदीसाठी झुंबड उडत आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सकाळी १० वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

👉 हे ही वाचा:  नाशिक: गंगापूर धरण ६१% भरले; गतवर्षीपेक्षा ३६.८% जास्त
👉 हे ही वाचा:  नाशिक: वकिल असल्याचा बनाव करून फसवणूक करणारा भामटा नाशिकमध्ये गजाआड !

याठिकाणी बॅरिकेडिंग:
रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, शालिमार कॉर्नर, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड याठिकाणी पोलिस बेरिकेडिंग राहणार आहे, तसेच पोलिस अधिकारी, अंमलदार यांची स्वतंत्ररीत्या नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790