नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मल्टिनॅशनल कंपनीत गुंतवणूक करून मोठा अर्थिक मोबदला देण्याचे आमिष देत शहरातील एका उद्योजकाला तब्बल तीन कोटी ४६ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. इंदिरानगर पोलिस ठाण्यात आठ संशयितांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची माहिती आणि राहुल सावळे (रा. इंदिरानगर) यांच्या तक्रारीनुसार २०२२ मध्ये संशयित चंदनकुमार बेरा (पश्चिम बंगाल) याने इनोव्होल्टा कंपनीची माहिती दिली.
मल्टिनॅशनल कंपनी असून राइस पुलर बिसीन नावाखाली रेडिओअॅक्टिव्ह युरेनियममध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल असे आमिष दिले. सावळे यांनी गुंतवणूकही केली.
संशयित रघुवीर कुमार संधू, मुकेश कुमार, कांतीकुमार, बप्पीदास, आशिष रॉय, अरुप घोष, बोलोमन मिन्ट यांनी संगनमत करत इनोव्होल्टा कंपनीची बोगस कागदपत्रे तयार करत वेळोवेळी ३ कोटी ४६ लाखांची रक्कम घेतली. सावळे यांनी पैशांची मागणी केली असता संशयितांनी धमकी देत पैसे देण्यास नकार दिला.