नाशिक: रो बंगलो प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तरुणाची २५ लाख रुपयांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): रो बंगलो साईट मध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडून बांधकाम व्यावसायीकाने एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणाची या घटनेत २५ लाख ७० हजार रूपयांची फसवणुक झाली असून, प्रोजेक्ट पुर्ण न करता बिल्डरने पैसेही परत न केल्याने हा प्रकार पोलिसांत पोहचला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाची थोडी उसंत; घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी 'यलो अलर्ट' जारी

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशययित यशपाल अभय टाटीया व दिपक बाळासाहेब धारराव अशी फसवणुक करणा-या संशयित बांधकाम व्यावसायिकांची  नावे आहेत. याप्रकरणी अथर्व अर्जुन देवरे (रा.रणजीत रवी अपा.कॅनडा कॉर्नर) या तरुणाने फिर्याद दिली आहे.

तक्रारदार व संशयित बिल्डर एकमेकांचे परिचीत असून ते पूर्वी एकाच भागात वास्तव्यास होते. संशयितांची ‘निर्मीती बिल्डटेक’ नावाची बांधकाम व्यवसायाची फर्म असून या फर्मच्या माध्यमातून सन.२०२२ मध्ये गंगापूर शिवारातील मोतीवाला कॉलेज भागात ‘वृंदावन रो-बंगलो’ नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्याचे आमिष युवकास दाखविण्यात आले होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

या बांधकाम साईडच्या माध्यमातून मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून त्यांनी फर्ममध्ये युवकास गुंतवणुक करण्यास भाग पाडले.

गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळणार असल्याने देवरे या युवकाने २५ लाख ७० हजार ३३७ रूपयांची भागीदारीसाठी गुंतवणुक केली असता ही फसवणुक झाली. संशयितांनी दोन अडिच वर्ष उलटूनही प्रस्तावित प्रोजेक्ट पूर्ण न करता तसेच गुंतवणुकीची रक्कम परत केली नाही त्यामुळे अथर्व देवरे या तरुणाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १७२/२०२४) अधिक तपास उपनिरीक्षक निसार अहमद करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790