नाशिक: १० कोटींचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून १५ लाख हडपले

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): हळदीचा प्रोजेक्ट टाकण्यासाठी १० कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून एका उद्योजकाला १५ लाखांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी उद्योजकाने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी संजय सुभाष देशमुख (वय ५०) यांची चिंचवड येथील प्रीती प्लाझा येथे गुडविल ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक कंपनी आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आठवडाभर थंडीचा मुक्काम कायम राहणार !

दरम्यान संशयित आरोपी रोहित पाटील याने फिर्यादी देशमुख यांना त्यांच्या हळदीच्या प्रोजेक्टसाठी १० कोटी रुपयांचे कर्ज काढून देतो, असे आमिष दाखविले.

पाटील याने दिलेल्या माहितीवर फिर्यादी देशमुख यांचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपी पाटील याने कर्ज काढून देण्याच्या बदल्यात विविध कारणांसाठी १५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारली मात्र, तीन वर्षे उलटूनही कर्ज मिळत नसल्यामुळे त्यांनी आरोपी पाटील याच्याकडे या कर्ज प्रकरणाबाबत विचारणा केली असता

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सूर्यकिरण एअर शो'मुळे २२ व २३ जानेवारीला 'या' वाहतूक मार्गात बदल

त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. हा प्रकार दि. १ जानेवारी २०२१ ते दि. ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत नाशिक-मुंबई महामार्गावरील अंबड येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये घडला. आपली फसवणूक होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी अंबड पोलिस ठाण्यात आरोपी रोहित पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790