नाशिक: शेअर्समध्ये जादा पैशांचे आमिष, ९५ लाखांना गंडा; ऑनलाइन ट्रेडिंगची भूल

नाशिक (प्रतिनिधी): मोबाइलवरून शेअर मार्केटमध्ये जादा पैसे कमावण्याचे आमिष दाखवून जाळ्यात फसवत एका शेती व्यावसायिकाची ९४.८६ लाखांची फसवणूक करण्यात आली.

अनोळखी मोबाइल क्रमांकावरून आलेल्या कॉलनंतर जुजबी माहितीच्या आधारे ऑनलाइन शेअर ट्रेडिंग सुरू केल्याने या व्यावसायिकाला शेतीत कमावलेली रक्कम गमावण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: नाशिक जिल्ह्यात ५० लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

पोलिसांनी दिलेली माहिती आणि शेती व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२३ ते मे २०२४ या कालावधीत मोबाइलवर सोशल मीडियाच्या साइटवर अनोळखी क्रमांकावरून त्यांना शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल अशी जाहिरात आली.

त्यानंतर वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलधारकांनी शेतकरी व इतरांना शेअर्स मार्केटमध्ये ट्रेडिंगची माहिती दिली. विविध नामांकित कंपन्यांच्या शेअर्सचा पोर्टफोलिओ पाठवत कशाप्रकारे नफा मिळतो याची माहिती दिली. तसेच शेअर्स मार्केटमध्ये तुम्हीदेखील ऑनलाइन ट्रेडिंग करू शकता असे सांगत ऑनलाइन प्रशिक्षण दिले.

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्‍नॅचरसह दोघा सराफांना 3 वर्षे सश्रम कारावास !

शेतकऱ्यासह इतरांनाही अशाचप्रकारे प्रशिक्षण देत ट्रेडिंग करण्यास भाग पाडले. नामांकित कंपन्यांचे शेअर्स खरेदी केल्यास अल्पावधीत शेअर्सच्या किमती वाढतील असे सांगत कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यास सांगत संशयितांनी कंपनीच्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित शेती व्यावसायिकाने विविध बँकांत वेळोवेळी ९४ लाख ८६ हजार ऑनलाइन भरले.

हे ही वाचा:  नाशिक: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे निर्बंध जारी!

अकरा महिन्यांनंतर खरेदी केलेले शेअर्स विक्री करण्यास सांगितले असता संशयितांनी आणखी पैसे भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790