नाशिक (प्रतिनिधी): कुरिअर देण्याचा बहाणा करत मोबाइल खेचून नेणाऱ्या व्यावसायिकाच्या कंपनीच्या खात्यातून ३ कोटी ५० हजारांची रक्कम सायबर पोलिसांनी बँकेशी संपर्क साधून पैसे परत मिळून दिले. मात्र अद्याप संशयितांना पकडण्यात सायबर पोलिसांना अद्याप यश न आल्याने एवढी मोठी रक्कम कशी आणि का ट्रान्सफर झाली याचा उलगडा झाला नसल्याने या गुन्ह्याचे गुढ वाढले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती २ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता दोघांनी कुरिअर देण्याचा बहाणा करत व्यावसायिकाच्या हातातील मोबाइल खेचून नेला होता. काही वेळात मोबाइल हॅक करत दोन बँक खात्यातून धुळे देवपूर येथील एका शेतकऱ्याच्या बँक खात्यात ३ कोटी ५० लाखांची रक्कम ऑनलाइन जमा केली होती. सायबर पोलिसांनी बँकेला ईमेल नोटीस पाठवत दोन्ही खाते फ्रिज केले होते.
खात्यातून १ कोटी रक्कम काढण्यासाठी खातेदार आल्याची माहिती बँकेने दिली होती. खातेदाराला थांबवून ठेवण्यास सांगितले होते. धुळे सायबर पोलिसांच्या मदतीने खातेदाराला ताब्यात घेण्यात आले. मात्र रक्कम वर्ग करणारे संशयित अद्याप फरार असून ही रक्कम का कशासाठी वर्ग झाली याचे गुढ वाढले आहे.
सदरची कामगिरी सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे, नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक पाटील, हवालदार मनिश धनवटे, दर्शन सोनवणे, सविता गावले व प्रतिभा पोखरकर यांच्या टीम ने केली . या कारवाईसाठी आयसीआयसीआय बँक, गोविंदनगर शाखेचे रिजनल हेड विक्रांत माळवदे, एचडीएफसी बँकेचे देवपुर शाखेचे भूषण जैन यांचे सहकार्य लाभले.
![]()


