नाशिक: फेक ॲप्लिकेशन पाठवून सायबर भामट्याने बँक खात्यातून 5 लाख लांबवले

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जिओ कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून सायबर भामट्याने मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून फिर्यादी महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख ३५ हजारांची रक्कम काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार घडला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहिनी शामलाल नरियानी (६६, रा. गायके कॉलनी, धोंगडेनगर, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या १८ नोव्हेंबर रोजी अज्ञात संशयिताने त्यांच्या मोबाईलवर फोन केला आणि जिओ कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले.

त्यावेळी संशयिताने मोहिनी यांना त्यांच्या मोबाईलच्या व्हॉटसॲपवर एक ॲप्लिकेशन पाठविले आणि ते त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्याप्रमाणे मोहिनी यांनी ते ॲप्लिकेशन व्हॉटसॲपवरून डाऊनलोड केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

मात्र संशयित सायबर भामट्याने त्यानंतर त्यांच्या मोबाईल हॅक करून घेत त्यांच्या बँक खात्यातील ५ लाख ३५ हजार ७०० रुपयांची रक्कम ऑनलाईन वर्ग करून घेत त्यांची फसवणूक केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

सदरचा प्रकार दुपारी पावणे बारा ते पावणे दोन या वेळेत झाला. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here